logo

महाराष्ट्र शासन

सांस्कृतिक कार्य विभाग

logo

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय

पुरस्कार आणि शिष्यवृत्ती

मेनू

पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार

पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे वारसा जतन, संग्रहालय चळवळ –उभारणी या विषयांतील योगदान मोलाचे आहे. ते केवळ संग्रहालय व्यवस्थापन नव्हे तर पुरातत्त्व, वारसा संरक्षण, कला, वास्तुविद्या आणि प्रतिमशास्त्र या विषयास देखील तज्ञ होते. त्यांना भारतातील संग्रहालय शास्त्राचे भीष्मपितामह असेही संबोधले जाते. पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचा मुंबई शहरामध्ये सुरू झालेल्या वारसा संरक्षण चळवळीमधील सहभाग महत्वाचा असून, वारसा स्थळांचे संरक्षण करणारे कायदे अस्तित्वात आणण्यात त्यांचे प्रमुख योगदान होते. संग्रहालयशास्त्र विषयातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सन २००३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. पुवसं २०१९/प्र. क्र/९३/सां. का.३, दि १८.०८.२०१९ अन्वये पद्मश्री सदाशिव गोरक्षक जीवनगौरव पुरस्कार योजना घोषित केली आहे. सदर पुरस्काराची रक्कम रु. ५,००,०००/- (रु. पाच लक्ष मात्र) एवढी आहे. वस्तुसंग्रहालय या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ संशोधकांना रु. ५,००,०००/- (रु. पाच लक्ष मात्र) रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या प्रयोजनसाठी महाराष्ट्रातील संशोधकांना प्राधान्य देण्यात येईल.









इतर लिंक

महत्त्वाची लिंक

संपर्क